Top 30 Valentine Day Quotes in Marathi 2022

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram

व्हॅलेंटाइन्स डे’…Valentine Day Quotes in Marathi आपल्या खास व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमी जोडपी या दिवसाची आतुरतेनं वाट पाहतात. हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक कपल काही-न्-काही जगावेगळा प्लान आखण्याचा प्रयत्न करतात. महागड्या भेटवस्तू, व्हॅलेंटाइन डेट (valentines day in marathi), डेस्टिनेशन डेट यांसारखे पर्याय तुमच्या डोक्यात असतीलच. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांचाही कधीतरी आधार घ्यावा. 

‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या प्रियकर/ प्रेयसी (valentines day quotes for girlfriend and boyfriend in marathi), मित्र-मैत्रिण, पतीला प्रेमाचे मेसेज (valentines day quotes for husband in marathi), प्रेमाचे संदेश (valentines day Quotes in marathi) पाठवून त्यांच्या दिवसाची चांगली सुरुवात करायला विसरू नका.

Table of Contents

व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा (Valentines Day Quotes In Marathi For Husband/Boyfriend)

नातं जरी जुने झालं असलं तरी नात्यातील प्रेम काळानुसार अधिक वाढत जाते. कारण आयुष्यात कितीही सुखदुःख आली तरी  आपला जोडीदार आपली साथ सोडून कधीही जात नाही. याच जोडीदाराला ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला प्रेमाचे मेसेज (Valentine Day Quotes in Marathi 2022) पाठवून ‘तु माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस’ ही भावना व्यक्त करा.

असतोस तू जेव्हा
हसूही तरळे अलगद ओठांवरी
पाहत राहावे तुला आणि
तुलाच उमगावे मी
लाडे लाडे तुला छळावे
सर्व लाड पुरवून घ्यावे
कोणास ठाऊक पुन्हा
असे दिवस कधी यावे
असतोस तू जेव्हा
मिठीत तुझ्या विसावे
क्षणाच्या सहवासात जन्माचे
जगून घ्यावे
खांद्यावर डोके ठेवून कायमचे
तुझे होऊन जावे
विरहाचे क्षण येता पुन्हा अलगद
आसवांनी तुझे व्हावे
डोळ्यांनी तुला सांगावे
असतोस तू जेव्हा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
दिपाली नाफडे
तास-तास एखाद्या व्यक्तीची वाट 
पाहणं यासारख्या यातना नाहीत.
पण कुणीतरी आपली वाटत पाहत
आहे, या जाणिवेसारखं सुखही नाही.
या जाणिवेतूनच माणसं धावत्या
गाड्या पकडतात
व.पु. काळे, लेखक
काल रात्री
तुझ्या उघड्या पाठीवर
नखांनी लिहिलेली कविता..
मला तोंडपाठ करायची आहे!
वैभव जोशी
हो येतो मला प्रचंड राग तुझ्या 
सतत फोन करण्याचा
तुझ्या त्या सतत प्रश्न विचारण्याच्या
सवईमुळेही माझा संताप होतो
पण तू नको बदलूस
तू करत जा मला फोन, विचारत जा
विनाकारण मनात येणारे ते प्रश्न
कंटाळवाण्या दिवसातला हा माझा
विरंगुळा झालाय आता
नेहमी चिडणारा मी तुझा फोन नाही
आला तरी चिडतो
शिवराज यादव
 ये…लपेटून चांदणे घेऊ
तू कशाला दिलीस शाल मला?
सुरेश भट, कवी
तुझ्या माझ्या प्रेमाला
तुझी माझी ओढ
थोडं तु पुढे ये
थोडं मला मागे ओढ…
प्रदीप वाघमारे
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
कधी बोलावसं वाटलं तरी नक्की बोल
ऐकण्यासाठी मी असेल
प्रश्न असतील मनात तुझ्या तर
उत्तर देण्यासाठी मी असेल
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine Day Quotes in Marathi For Husband/Boyfriend)

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Happy Valentines Day !
भरभरून बोलायचं असतं तेव्हा
आणि माझं मौन ओळखायचं असतं तेव्हाही
जवळ फक्त तूच हवास…
सतत खळखळ हसणं
आणि छोट्याछोट्या गोष्टीवरचं रुसणं
ते समजून घ्यायलाही,
जवळ फक्त तूच हवास…
शब्द माझे बोचणारे पण
प्रेम मात्र दोनशे टक्के खरं
तरीही तुझी नकोशी
असणारी कारणं ऐकूनही
जवळ फक्त तूच हवास…
मन कितीही अस्ताव्यस्त असो
ते एका क्षणात सावरायला
जवळ फक्त तूच हवास…
पण हे फक्त माझं म्हणणं,
तुझं विश्व वेगळंच,
मी मात्र तुला आपलं आपलं म्हणावं
आणि तू सहज तो बंध तोडून जावं
एक दिवस येईल असाही तू
म्हणशील आज जवळ फक्त तूच राहावं
पण….
या पण मध्येही स्वतःला हरवून
जिंकले असेन मी…
कारण फक्त एकच
जवळ फक्त तूच हवास…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
दिपाली नाफडे
हे असं मला बेसावध गाठणं
अनपेक्षित दाटणं
निशब्द होत गहिवरून भेटणं
सावरण्या आधीच चिंब करून टाकणं
तुला पावसानं शिकवलंय की
तु त्याला नादावलंय?
गुरू ठाकूर
Valentine Day ला कोणतं 
गिफ्ट मागायचं असेल,
तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट नाही…
Happy Valentines Day!
कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !
Happy Valentine Day
तिला पण बोला..
जी तुम्हाला तुमच्या
जन्म देण्याच्या आधीपासून,
तुमच्यावर खूप प्रेम करते…
असतोस तू जेव्हा
हसूही तरळे अलगद ओठांवरी
पाहत राहावे तुला आणि
तुलाच उमगावे मी
लाडे लाडे तुला छळावे
सर्व लाड पुरवून घ्यावे
कोणास ठाऊक पुन्हा असे
दिवस कधी यावे
असतोस तू जेव्हा
मिठीत तुझ्या विसावे
क्षणाच्या सहवासात जन्माचे
जगून घ्यावे
खांद्यावर डोके ठेवून कायमचे
तुझे होऊन जावे
विरहाचे क्षण येता पुन्हा अलगद
आसवांनी तुझे व्हावे
डोळ्यांनी तुला सांगावे
असतोस तू जेव्हा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
दिपाली नाफडे
मी प्रश्न होऊन डसता
उत्तरात केवळ हसते
अन् सोपी म्हणता म्हणता
ती अवघड होऊन बसते
गुरू ठाकूर
कधी वाटते वाटते
तुला द्यावे असे काही
ज्यातत लपेल आकाश
लोपतील दिशा दाही
असे काही तुला द्यावे
भाबडे नि साधे भोळे
राधेचीही पडो दृष्ट
द्रौपदीचे दिपो डोळे
माझे नसून मी द्यावे
तुझे व्हावे दिल्यावीण
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे
जन्म टाकाया गहाण
विंदा करंदीकर
या Valentines Day ला
मला गिफ्ट मध्ये,
तू आणि तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
Happy Valentine Day Jaan!
दिवसामागून दिवस गेले,
उत्तर तुझे कळेना..
आजच्या या प्रेमदिवशी,
समज माझ्या वेदना…
प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला
खूप खूप शुभेच्छा…
Happy Valentines Day!
Love You So Much My Love..
बॉस : तुला १४ तारखेला सुट्टी 
कशाला हवी आहे?
मन्या : सर वॅलेंटाईन डे
निमित्त सकाळी पूजा,
दुपारी अर्चना आणि
रात्री आरती चा कार्यक्रम
ठेवला आहे…

Valentine Day in Marathi For All

खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU”
हे जगातील सुंदर शब्द आहेत,
पण खरं तर…
“I LOVE YOU TOO”
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…
HAPPY VALENTINE DAY!
कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं
नको ते हातात येतं
हवं ते हुकत जात
अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडाला
न बोलता पाणी द्यावं
मंगेश पाडगावकर
आयुष्यात एक वेळ अशी येते
जेव्हा प्रश्न नको असतात
फक्त साथ हवी असते
व.पु.काळे
ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे,
ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
Happy Valentines Day!
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
I Love You!
Happy Valentines Day!
कधी सांजवेळी
मला आठवूनी
तुझ्या भोवताली
जराशी वळूनी
पाहशील का???
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
Happy Valentines Day !
ओळखीचा आवाज
काळोख्या जंगलात
तुझ्या मैत्रीची साथ
गहिऱ्या एकांतात
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
तुझी माझी सोबत, 
सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
कितीदा नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी नव्याने वहावे…
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी
कितीादा म्हणावे तुझे गीत ओठी
कितीदा सुकून पुन्हा फुलावे
देवयानी कर्वे
भाषा प्रेमाची मला कळते आहे
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे
आठवणीतही सौख्य तुझ्या
भेटीचे मज मिळते आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे 
प्रेम असतं7,
तुमचं आणी आमचं अगदी
‘सेम’ असतं !
मंगेश पाडगावकर
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे…
Happy Valentines Day!
I Love You!
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
माझ्यावरील तुझं प्रेम ते जिवापाड
मला डोळाभर पाहू दे…
माझंही जाणायचं असेल तर,
माझ्या डोळ्यापल्याड तुझीही नजर जाऊ दे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
माझे सोन्याचे आभाळ,
माझी सोनेरी संध्याकाळ…
सये माझ्या गळ्यातली
सोनियाची तु माळ…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
जीवनाच्या वाटेवर चालताना, 
कधी भेटलास तू
सोबती चालताना, अर्थ जगण्याचा
शिकवलास तू
कधी वाटेल भीती,
एकटे होण्याची
मित्रा, फक्त मागे वळून पाहा…
तुझ्याच पाठी असेन मी
हॅप्पी व्हॅलेटाइन्स डे
आयुष्यात माझ्या जेव्हा
दुःखाची लाट होती, अंधारी रात्र होती…
सावलीलाही घाबरणारी एकट्याची
अशी वाट होती..
तेव्हा मित्रा, फक्त तुझी आणि
तुझीच साथ होती
Happy Valentines Day !
काळोखाच्या वाटेवर चालताना, 
हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना,
आता फक्त तुझीच साथ..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine Day Quotes in Marathi 2022 For All

सहवासात तुझ्या,
व्याख्या मैत्रिची छान समजली…
सांगती तू असता,
जगण्याची रीत जणू मज उमजली….
Happy Valentines Day !
कधी कधी रुसणं देखील 
आहे महत्त्वाचं
ज्यामुळे माहिती पडते की…
आपला रुसवा दूर करणारंही
कोणी तरी आहे…
Happy Valentines Day !
श्वासात गुंतलेला श्वास हा 
सोडवत नव्हता
भिजलेल्या उसासांचा गंध
तेवढा दरवळत होता
भरलेल्या डोळ्यांनी पाहिले
धूसर स्वप्नांचे जाळे
ओवाळलेल्या मिठीत मुक्या
शब्दांचे पहारे
मनातल्या अंगणात
किलबिलाट सारा
मंद स्मित वेचतो हा
बेधुंद किनारा
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
सुविधा लोखंडे
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentines Day !
असंच कधी तुला,
माझ्या आठवणींत,
हसताना पाहायचंय…
जीवनाचं सुंदर स्वप्न मला,
आता तुझ्याचसोबत जगायचंय…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
केवढी असोशी, 
किती अनावर ओढ..
जाग्रणात मावत नाही आता वेड..
कारण तरी द्यायची किती लोकांना
ये पुन्हा लपू एखाद्या कवितेआड
– वैभव जोशी, कवी
तु प्रणयाची चाहूल
गुलाबी भूल
गुंतल्या नयनी दिसणारी की
अनुरागाची खूण
नजर चुकवून
लाज होऊन
उमटणारी ?
– गुरू ठाकूर
मित्र ही अशी व्यक्ती असते
जी तुमच्याबद्दल सगळं जाणूनही
तुमच्यावर प्रेम करते…
Happy Valentines Day !
प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे 
कमीपण घेण्याची वृत्ती लागते
स्वतःला लहान समजण्यातलं
मोठेपण मिळवायचं असतं
व.पु.काळे,लेखक
मनातले शब्द न शब्द तुलाच 
सांगायचे आहेत
भविष्याचे वेध तुला कवेत
घेऊनच घ्यायचे आहेत
रंगवलेली स्वप्ने सत्यात
साकारायची आहेत
प्रिये… त्यासाठी फक्त तुझी
साथ हवी आहे
Happy Valentines Day !
न सांगताच तू , 
मला उमगते सारे…
कळतात तुलाही,
मौनातील इशारे
दोघात कशाला मग,
शब्दांचे बांध
कळण्याचा चाले
कळण्याची संवाद
हॅप्पी व्हॅलेंटाईन डे
जीवन जगता जगता एकदाच 
प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात
जपायचं असतं
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
पाऊस म्हटलं की मला आठवते
तुझ्या उरातली धडधड
माझ्या आधाराशिवाय झालेलं
तुला पाऊल टाकणं अवघड…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
– दिपाली नाफडे
 घे हाती हात माझा, 
जगीचं सारं सुख तेव्हा तुझं असेल…
माझ्या प्रेमाच्या त्या सीमेपुढे,
अवघं ब्रह्मांड देखील
त्यावेळी खुजं असेल…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
स्पर्शांना अर्थ मिळाले
नात्यांना आली गोडी
माझ्यातून ‘मी’ कातरला
अन् सुटली सारी कोडी
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
गुरू ठाकूर
मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा
वेल गगनाशी भिडलेला
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं 
रहस्य मी जाणलंय…
आता मात्र मनात,
मी फक्त तुलाच ठाणलंय
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

Valentine Day Quotes in Marathi 2022 Status For All

व्हॉट्स अ‍ॅपमध्ये ‘स्टेटस फीचर’ अपडेट झाल्यापासून प्रत्येकाला स्वतंत्र मेसेज पाठवण्याचं प्रमाण कमी झालं आहे. हल्ली स्टेटसमध्येच एखाद्या ‘स्पेशल डे’च्या किंवा सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.Valentine Day Quotes in Marathi 

विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात
– स्पृहा जोशी, अभिनेत्री
तुझ्या प्रेमाचा रंग 
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण,
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
ना कसले बंध, 
ना कसली वचने…
मैत्री म्हणजे खरंतर,
मनाने जवळ असणे…
Happy Valentines Day !
अनेक लोक प्रेमात असूनही
सोबत नसतात,
तर काही सोबत असतात
पण प्रेमात नसतात
Happy Valentines Day !
मी पाहिले उजळूनही,
मी पाहिले निखळूनही
पण जाणले नाहीस तू..
लांबूनही..जवळूनही
वैभव जोशी
पैज लावू मधू हरे
अन् शर्कराही लाजते
का तुझ्या ओठास
काळी मुंगी देखील चावते?
– संदीप खरे
बंध जुळले असता, 
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं…
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
संगीत जुनच आहे 
सूर नव्यानं जुळताहेत
मनही काहीसं जुनच
तेही नवी तार छेडताहेत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
रात्री आकाश ओसंडुन
गेले होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
जितका माझ्यात भिनला आहेस 
तू तितकाच माझा आहेस का तू?
इतक्या वर्षानंतरही तुझ्याकडून
बरेच प्रेमाचे शब्द ऐकायचे आहेत
श्वासात तुझ्या गुरफटून जायचं आहे
हातात तुझा हात घेऊन तुझं
प्रेम जाणवायचं आहे
येशील का जवळ परत
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
दिपाली नाफडे
तुला सोडूनही येतो पुन्हा मी
तुझ्यापाशीच माघारी कितीदा?
– सुरेश भट

व्हॅलेंटाइन्स डेसाठी मीम्स (Valentines Day Memes)

फोटो मेसेज, मेसेज, शेरोशायरीपेक्षा बहुतांश जणांना मीम्स प्रचंड आवडतात. Valentine Day Quotes in Marathi एखादा सण असो किंवा स्पेशल डे, प्रत्येक गोष्टीवर मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला मीम्स 
भरपूर आवडत असतील तर व्हॅलेंटाइन्स
डेच्या दिवशी हे ‘बिग हार्ट’
असलेलं मीम नक्की पाठवा.
भांडकुदळ पण प्रेमळ गर्लफ्रेंड : 
मला वेळ दे, तुला माझ्याशी
बोलायला वेळ नसतो,
तुला आता दुसरं कोणी तरी
आवडू लागलं आहे,
अशा वेगवेगळ्या कारणांवरून
भांडण करून प्रेम व्यक्त करणाऱ्या
गर्लफ्रेंडसाठी योग्य मीम
मोठे-मोठे मेसेज पाठवणाऱ्या 
पार्टनरसाठी हे मीम अतिशय योग्य आहे.
जादू की झप्पी-पप्पी देणाऱ्या 
आपल्या पार्टनरला हे मीम नक्की पाठवा
प्राणिमित्र गर्लफ्रेंड : 
जर तुमची गर्लफ्रेंड पेट लव्हर
(Pet Lover)
असल्यास तिला हे मीम पाठवा.
आता राहवेन मुळीच
कसे सांगू हे तुला?
दाटून येते आभाळ सारे
दे सोबतीा हात मला
Happy Valentines Day !
प्रेम व्यक्त करा : गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडवरील 
प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ
‘I Love You’ म्हटलं तरी तुमचा
व्हॅलेंटाइन्स डे अतिशय चांगला साजरा होईल.
लाँग डिस्टन्स रिलेशनशिप : 
नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी
डिजिटल माध्यमांची मदत घ्या
आणि नात्यातील गोडवा टिकवून
ठेवण्याचे प्रयत्न करा.
रागवलेल्या गर्लफ्रेंडसाठी मीम : 
व्हॅलेंटाइन्स डेलादेखील तुमचं
पार्टनरसोबत भांडण झाले असेल
तर तिचा रुसवा दूर करण्यासाठी
हे मीम तिला पाठवा.
फोनवरून व्यक्त करा प्रेम : 
व्हॅलेंटाइन्स डेला तुम्ही एखाद्या कामामध्ये
व्यस्त असाल,
फोनवर देखील बोलणं शक्य नसेल
तर गर्लफ्रेंडला हे मीम पाठवा.
ती तुमच्या भावना समजून घेईल.
प्रेमाचा वर्षाव करणारा पार्टनर : 
तुमच्यावर सतत प्रेमाचा पाऊस
पाडणाऱ्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला
हे मीम पाठवून खूश करा.
एकटाच चालतो आहे आजवरी,
हात हाती घेशील का?
घेईन उंच भरारी तुजसवे
साथ मज देशील का?
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

This is all About Valentine Day Quotes in Marathi 2022 we add some more Soon…

Check Best Valentine Day Gift for Girlfriend

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like To Read

Disclaimer: www.anganwadivacancy.com is not official website or not affiliated to Integrated Child Development Service (ICDS) UP Govt or any other Government Body. If you have any issue with our website then contact our legal team. All the information and date provided here is just for reference and educational purpose. Kindly check full Disclaimer.

We Also Add Some Amazon Product Links if you buy From These Links we make some commission from it to run this site…so please support – Contact us anytime….

Scroll to Top